MPSC Online

ही आमची वेबसाइट आहे ज्यामध्ये आम्ही MPSC आणि इतर परीक्षांचे सर्व अभ्यास साहित्य, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिक??

.

This is our website in which we provide all study material, Previous year question paper, Latest update and much more about MPSC and other Exams. and you can get success in your carrier. ही आमची वेबसाइट आहे ज्यामध्ये आम्ही MPSC आणि इतर परीक्षांचे  सर्व अभ्यास साहित्य, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, नवीनतम अपडेट आणि बरेच काही प्रदान करतो. आमचा वेबसाईट ला दररोज भेट द्या आणि यशाचा मार्गावर अग्रेसर व्हा. वाचण्यासाठी येथे क्लिक करा MPSC Online 

पुढे आमचे काही आर्टिकल दिलेले आहेत ते पण वाचा. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये 'मऱ्हाष्ट्र राज्याची' स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली.

इतिहास - प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास -

भारताचा ऐतिहासिक कालखंड तीन भागात विभागला गेला आहे

  • प्राचीन भारताचा इतिहास
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास 
  • आधुनिक भारताचा इतिहास

प्राचीन भारताचा इतिहास भारतातील प्राचीन आर्य राजांची राजकीय व्यवस्था उदयापासूनचा इतिहास आर्य राजघराण्यांच्या अंतापर्यंतचा समावेश आहे, ज्यांना प्राचीन भारतीय क्षत्रिय म्हणतात. त्याचा कालावधी सुमारे ३००० ईसापूर्व ते इसवी सन १२०६ पर्यंत निर्धारित केला जातो. म्हणजेच या कालखंडाचा शेवट भारतात मुस्लिम राजवटीच्या स्थापनेने होतो.

इयत्ता पाचवी इतिहास – Class 5th History 

भारताची सांस्कृतिक विविधता

भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतका प्रदीर्घ इतिहास आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत. अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहेत. भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशांतून लोक भारतात आले. ते येथील संस्कृतीशी एकरूप झाले. यातून एक संमिश्र भारतीय संस्कृती आकारास आली आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आपण सारे भारतीय आहोत. भाषा, साहित्य, कला इत्यादींत विविधता असली, तरी भारतीय म्हणून आपण एक आहोत. ही विविधता भारतीयांमध्ये ऐक्यभावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे. आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झाले आहे.

इयत्ता सहावी इतिहास - Class 6th History

भारतीय उपखंड आणि इतिहास

इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो, हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला.

इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते.

इयत्ता सातवी इतिहास - Class 7th History 

इतिहासाची साधने

भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत.

भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात.